umarga 11.jpg 
मराठवाडा

उमरग्यातील तीन शाळकरी मुलांच्या मृत्यू प्रकरणात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल 

अविनाश काळे

उमरगा : तालुक्यातील दयानंदनगर कोळसूर (कल्याणी) तांड्यातील दोन मुली व एका शाळकरी मुलाचा रस्त्याच्या कडेलगत खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्या प्रकरणी राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या पी.बी.ए.आय. कंपनीचे मालक यांच्यासह प्रकल्प व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, निरीक्षक व एका शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम 

याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील दयानंदनगर तांड्यावरील तीन शाळकरी मुलांचा गुरूवारी दुपारी तलमोड शिवारातील विनोद मनोहर मोरे यांच्या शेतातील डोंगर खोदून केलेल्या खड्डयातील पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला.

या प्रकरणी संतोष हेमला राठोड यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, माझी मुलगी अंजली राठोड (वय १२) व भाची प्रतीक्षा मधुकर पवार (वय १०) आणि भाच्चा ओंकार राजुदास पवार (वय ११) हे तिघे राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी डोंगर खोदून मुरूम, माती काढण्यासाठी खोदलेल्या खड्डयातील पाण्यामध्ये पडून दूर्देवी मृत्यू झाला. पी.बी.ए.आय. कंपनीने गेल्या सात-आठ महिन्यापासून तलमोड शिवारातील विकास मोरे यांच्या सर्वे नं (७१/७२) शेतातील डोंगर खोदून माती व खडक काढून मोठा खड्डा केला होता. खड्डयात पडून मृत्यू होऊ शकतो हे माहित असतानाही तेथे सूरक्षेसाठी कोणतेही उपाययोजना केली नाही. शिवाय सूचना फलक लावला नाही, खड्डा बुजवून घेतला नाही.

या प्रकरणी पी.बी.ए.आय. कंपनीचे मालक (नाव माहित नाही), प्रकल्प व्यवस्थापक धमेंद्र कुमार, सहाय्यक व्यवस्थापक प्रमोद चांडके, निरीक्षक भगवान चव्हाण व तलमोडचा शेतकरी विनोद मोरे यांच्या विरूद्ध हलगर्जीपणामुळे तीन मुलांचा दुर्देवी मृत्यु झाल्याप्रकरणी गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे तपास करीत आहेत. दरम्यान गुन्हा दाखल झालेल्या लोकांना ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे श्री. गोरे यांनी सांगितले.

Edited By Pratap Awachar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB चा फलंदाज Unstoppable ! १४ चेंडूंत ६४ धावा कुटून संघाला मिळवून दिला दणदणीत विजय; KKR ला होतोय पश्चाताप

Latest Maharashtra News Updates : बदलापुरात गावगुंडांकडून पोळी भाजी केंद्राची तोडफोड

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर डबल बेड मॅट्रेस अन् सोफ्यासह दुरुस्तीचा खर्च तब्बल ४० लाख; इतकी उधळपट्टी कशाला? विरोधकांचा सवाल

Gemini Photo Trend : गुगल जेमिनीवर तुम्ही फोटो बनवताय, पण त्या फोटोचे पुढे काय होते? खरंच यामुळे डेटा लिक होतो का..जाणून घ्या सत्य

Maruti car price cut : दसरा, दिवाळीच्या आधी ‘मारूती’चा बडा धमका! कारच्या किंमतींमध्ये मोठी कपात जाहीर

SCROLL FOR NEXT